निलजी गावात बसवण्यात येणारा बेकायदेशीर मोबईल टावर हटवा अशी मागणी करत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करण्यात आली. निलजी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करून बेकायदेशीर मोबईल टावर च काम थांबवा अशी मागणी जिल्हाधिकारी एन जयराम यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे .
बळवंत रामचंद्र देसाई नामक व्यक्तीच्या शेतात हा टावर उभारला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे या टावर मुळे लहान मुलांच्या आरोग्याला लोकांच्या ये जा करण्यास त्रास होत आहे. यावेळी गोपाल मोदगेकर ,मालन मोदगेकर आदी उपस्थित होते.