हिरेबागेवाडीत कोणत्याही स्थितीत कत्तलखाना होऊ देणार नाही अशी मागणी करत हिरेबागेवाडी ग्रामस्थानी जिल्हाधिकारी कार्यलया समोर निदर्शन केली.
भाजप आमदार संजय पाटील, काँग्रेस नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी देखील मोर्चात सहभाग दर्शविला होता.
राज्य सरकार ने कॅबिनेट मीटिंग मध्ये हिरेबागेवाडीत कत्तलखाना करण्याबाबत निर्णय घेतला होता या विरोधात हिरेबागेवाडी ग्रामस्थांनी आंदोलन केले.
90 एकर जमिनीत अत्याधुनिक कत्तलखाना उभारणार आहेत याला विरोध करण्यात आला जिल्हाधिकार्या द्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन हा विरोध करण्यात आला.