डॉल्बी लावण्यास लेखी परवानगी नसल्याने पालिसांनी आगमन मिरवणूक रोखून धरली होती मात्र गणेश महा मंडळाच्या कार्यतत्परतेमूळ ग्लोब थिएटर जवळ थांबलेली मिरवणूक पुढे सरकली आहे.
गणरायच्या आगमन सोहळ्यास सार्वजनिक मंडळांना पोलिसांनी डॉल्बी लावण्यास लेखी परवानगी दिली नव्हती फक्त विसर्जन मिरवणुकुसाठी 95 डेसीबल ची आवाज मर्यादा केली असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलं होतं.
शुक्रवारी शहरातील गणेश आगमन सोहळ्यात जवळपास 15 ते 20 सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बी लावलो होती कॅम्प येथील गणेश मंडळांन लावलेली डॉल्बी कॅम्प पोलीस निरीक्षकानीं बंद केली होती मिरवणूक थांबली होती मात्र गणेश महा मंडळाचे पी आर ओ विकास कलघटगी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी ग्लोब थिएटर जवळ जाऊन पोलीस आयुकताना संपर्क करून सर्व मंडळ 75 डेसीबल च्या आत डॉल्बी लावू अशी विनंती करून मिरवणूक पुन्हा सुरू केली . विसर्जन मुरवणुकीत परवानगी घेऊ अशी पोलीस निरीक्षकांची समजूत घालून वाद शमविला. महा मंडळाच्या या कार्याने पुन्हा एकदा महामंडळ आणि प्रशासनात सहकार्य करून आपली कार्यतत्परता दाखविली आहे
Trending Now