बेडर रामोशी समाजाचा आक्रोश मांडणारे डॉ भीमराव गस्ती अनंतात विलीन झाले. यमुनापूर येथे मंगळवारी अंत्यविधी झाले.
कोल्हापूर येथील सरस्वती इस्पितळात डॉ गस्ती यांना दाखल करण्यात आले होते. मध्यरात्री १ च्या सुमारास त्यांनि अखेरचा श्वास घेतला. ६८ वर्षांचे होते. सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव यमुनापूर येथे आणण्यात आले. दुपारी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा सुरेश तसेच सून व नातू असा परिवार आहे. यमनापूर येथे महाराष्ट्रातून भटक्या विमुक्त चळवळीतील अनेक दिग्ग्जणी श्रद्धांजली वाहिली . यावेळी निपाणी डॉ अच्युत माने ,प्रा विठ्ठल बने, भटक्या विमुक्त चकवळीचे मधूसुदन व्हटकर( सोलापूर ),कोल्हापूर जिल्हा माहिती आयुक्त सतीश लळीत,प्रा शिवानंद गस्ती,आनंदराव जाधव सातारा,प्रा सुनील माने,कल्लापा जंगली, गडहिंग्लज बाळेश बंधुनाईक ,जेष्ठ पत्रकार सुभाष ढुमे आदी यावेळी उपस्थित होते .
पालिकेत वाहिली श्रद्धांजली
भीमराव गस्ती यांना बेळगाव महा पालिके तर्फे देखील श्रद्धांजली वाहण्यात आली . पालिका आयुक्त शशिधर कुरेर , महापौर संज्योत बांदेकर उपमहपापूर नागेश मंडोळकर ,आमदार संभाजी पाटील, पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या सह नगरसेवकांनी पालिकेत बैठकी अगोदर मौन पाळून श्रधान्जली वाहिली