बेळगाव शेतकरी संघटनेच्या वतीने शेत जमिनी वाचविण्याचे शेतकऱ्यांना तारण्याचे जे लढे सुरू आहेत त्या अंदोलनाना जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक,शेतकऱ्या विरोधातील अन्यायावर लढणारे 100 वर्षीय दोरायस्वामी यांनी आपला पाठिंबा दिला आहे.दोरायस्वामी यांचे निकटवर्तीय नागराज यांनी आज बेळगावला भेट देऊन शेतकरी नेत्यां बरोबर चर्चा केली.
रविवारी सकाळी सर्किट हाऊस येथे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण,संयुक्त शेतकरी संघाचे अध्यक्ष सिद्धप्पा मोदगी, समाज सेवक साजिद सय्यद अन्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सांडपाणी प्रकल्पास भेट
बंगळुरू हुन आलेले नागराज आणि बेळगाव शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी हलगा आणि अलारवाड येथील जुन्या आणि नवीन प्रकल्प प्रस्तावित भु संपादन जमीनीची पाहणी केली .याची सगळी माहिती दोरायस्वामी यांना देण्यात येणार असून लवकरच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेण्यात येणार आहे.हलगा सांडपाणी प्रकल्प मधला शेतकऱ्यां वरील अन्याय दोरायस्वामी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहेत.