आगामी विधानसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसं बेळगाव शहराच्या अखत्यारीतील उत्तर आणि दक्षिण अश्या दोन्ही मतदार संघात इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे.
बेळगाव उत्तर विधान मतदार संघात जशी चुरस आहे नेमकी तशीच किंवा त्याहूनही अधिक चुरस दक्षिण मध्ये पहायला मिळत आहे अनेक इच्छुक कामाला लागलेत वन महोत्सव,सत्कार, स्वछता अभियान,विविध स्पर्धांचे आयोजन असे कार्यक्रम प्रत्येक इच्छुक करू लागला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह दोन दिवस कर्नाटक दौऱ्यावर आहेत कोणतेही कार्यक्रम करणे लगेच सोशल मीडियावर टाकणे असा धडाकाच या इच्छुकांनी लावला आहे.दक्षिणेत उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हा लाख मोलाचा प्रश्न आहे.
भाजप मधील उमेदवारांचा एक गट तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असुन आपल्या गटातील कुणालाही उमेदवारी मिळाल्यास आपण काम करू अन्यथा माजी आमदारास दिल्यास पक्षाला फटका बसेल असा इशारा जिल्ह्यातील स्थानिक नेतृत्वास दिला आहे.इच्छुक असलेल्याच्या कार्यरत गटात पांडुरंग धोत्रे
डॉ दोडमनी ,सुनील चौगुले, चिदंबर देशपांडे,दीपक जमखंडी,तेजस्विनी धाकलूचे ,जितेंद्र कदम सामील आहेत.
नुकताच भाजप किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद मिळवलेले शंकर गौडा पाटील देखील भाजप मधून तिकीट मिळवण्यासाठी वरच्या पातळी वर प्रयत्नशील आहेत. यामुळे नेमके किती उत्सुक आणि तिकीट कुणाला हा प्रश्नच असून त्यावर पुढचे राजकारण ठरणार आहे.
SARVA KAM SARVAAN ZEPAT NAHI. JANCHE KSHMATA HAI TENECH KARAVE. JANCHE KAAM TENICH KARAAVE.
DEVASA SWAPNA BAGU NAWE.
Hmmm
Sunil chougule
Dr dodamani