राज्यातील सर्वात मोठी जिल्हा पंचायत असलेल्या बेळगाव जिल्हा पंचायतीस राजीव गांधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे अशी माहिती जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे यांनी दिली आहे.
आशा ऐहोळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना यशस्वी पणे लागू करून या कामांची योग्य रित्या अंमलबजावणी करून घेतली आहे हे ओळखून केंद्र सरकारने बेळगाव जिल्हा पंचायतीस पुरस्कार मिळाला आहे. 20 आगष्ट रोजी चेन्नई येथे होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे.