9 आगष्ट रोजी बेळगावातून मुंबईतील जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चास सहभागी होणाऱ्यानी ज्या पद्धतीनं बेळगावातील ऐतिहासिक मराठा मोर्चात शांतता राखून आचार संहिता पाळली त्याच पद्धतीने मुंबईतील मोर्चा शांततेत पार पाडावा अस आवाहन बेळगावातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
राविवारी जत्तीमठात मुंबई मोर्चा संबंधी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई मोर्चास शेकडो मराठी बांधव सामील होणार आहेत अनेक जण आपापल्या खासगी वाहनासह, बस रेल्वेने गटाने सामील होणार आहेत अश्या सर्वानी सोमवारी दिवसभर रंगुबाई पॅलेस मध्ये नाव नोंदणी करावी सगळ्यानी गटा गटाने मोर्चात सामील व्हावे एकटा सामील होऊ नये असं देखील मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत ठरविण्यात आले आहे.
क्रांती मोर्चा झेंडे टी शर्ट आणि इतर साहित्य विक्री रंगुबाई पॅलेस मध्ये करण्यात येणार आहे.
मोर्चा काळात बेळगाव हुन मुंबईला जाणाऱ्या साठी हेल्पलाईन काढण्यात आली असून कोणतीही मदत लागल्यास गणेश दड्डीकर 9844497097,सुनील जाधव 9964370261,दत्ता उघाडे 9484402102 तसंच महेश जुवेकर 9901909333 तर राजू मर्व्हे 9480743299 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे
बेळगाव सीमा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी या मोर्चात 14 व्या क्रमांकाची असल्याने बेळगावातून मुंबई मोर्चास जाणाऱ्या मराठी भाषकांची संख्या वाढली आहे.बैठकीला सकल मराठा समाजाचे सदस्य उपस्थित होते.