Tuesday, November 19, 2024

/

दुर्लक्षित हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण झाले पाहिजे – परशुरामभाऊ नंदीहळ्ळी

 belgaum

देशाला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाली, आणि आम्ही आज ७१ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना बेळगाव शहरातील हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. परवा 75 वा ऑगस्ट क्रांतिदिन कार्यक्रम याच ठिकाणी झाला, यावेळी बेळगावचे आमदार फिरोज सेठ ,महापौर संज्योत बांदेकर, यांनी या स्मारकाचे सुशोभीकरण केले जाईल अशी ग्वाही दिल्याचे त्यांनी सांगितले, ते ७१ व्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलत होते,
सुरुवातीला माजी महापौर नागेश सातेरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
नागेश सातेरी म्हणाले की स्वतंत्र भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन २६ जानेवारी १९४७ रोजी करायचा निर्णय झाला, पण तेव्हाच भारतीय राज्यघटना तयार केली गेली त्यामुळे तो दिवस गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला गेला, आणि १५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला.
यावेळी जायंट्स मेन च्या वतीने बोलताना माजी अध्यक्ष मदन बामणे म्हणाले की भारताचा आज ७१ वा स्वातंत्र्य दिन आम्ही उत्साहात साजरा करतो आहोत पण आज जी परिस्थिती उद्भवलेली पहिली तर आज पावसाचा पत्ता नाही, यासाठी प्रत्येकाने वर्षभर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. आणि हा देश हरित केला तरच या पुढे हे नैसर्गिक संकट दूर होईल असे सांगितले,
बेळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि बेळगाव मार्ग संस्थेच्या वतीने कृष्णा शहापुरकर व पत्रकार संजय सूर्यवंशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शुभदा कुलकर्णी यांनी ए मेरे वतन के लोगो हे देश भक्तीपर गीत सादर केले,
प्रस्तावना दिलीप सोहनी यांनी केली तर सुत्रसंचलन महादेव पाटील यांनी केले,
यावेळी अॅड. अशोक पोतदार, मोहन कारेकर, अशोक हलगेकर, मधु बेळगावकर, महेश शहापुरकर, सुनील चौगुले, सुनील मुतगेकर, महादेव किल्लेकर, भाऊ किल्लेकर, विशाल मुरकुटे, राहुल बेलवलकर, लक्ष्मण शिंदे, मधु पाटील, भरत गावडे, शिवराज पाटील, दिगंबर किल्लेकर, जयवंत पाटील, अविनाश पाटील, अनिल चौगुले, विजय बनसुर,मुकुंद महागावकर, संजय शि.पाटील, ईश्वर पाटील, अरुण काळे, रमेश भादवणकर, प्रकाश पवार, सुहास हुद्दार, शेखर पाटील, शाहीर यल्लापा बिर्जे, पांडुरंग पालेकर, विठ्ठल शिरोडकर, राजश्री तुडयेकर, आणि बरेच नागरिक उपस्थित होते,

बातमी  सौजन्य- महादेव पाटीलHutatma

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.