ट्रॅफिक समस्यावर मात करण्यासाठी रिंग रोड शहरापासून 10 की मी लांब करा अशी सूचना वकिलांच्या एक शिष्टमंडळाने केली आहे. बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांची भेट घेऊन निवेदन देऊन ही मागणी केली आहे
राज्य सरकारच्या वतीने लवकरच शहराच्या बाहेरून रिंग रोड करण्याचा निर्णय घेत आहे. शहराच्या चारी बाजूनी पिकाऊ शेत जमिन असून शेतकरी या जमीनीत दरवर्षी दोबार पीक घेत असतात .सदर पिकाऊ जमीन रोड बनवण्यास योग्य नाही आहे.
शहराच्या 10 की मी लांब असलेली जमीन नापीक असून ड क्लास अशी नोंद आहे आणि रोड निर्माण करण्यास योग्य आहे. शहरातील रहदारी वर नियंत्रण ठेवण्यासाठी दहा की मी लांब रोड करा अशी मागणी करण्यात आली आहे.यावेळी यावेळी वकील हर्षवर्धनपाटील,अणणसाहेब घोरपडे, आदी उपस्थित होते.