खासदार सुरेश अंगडी यांनी लिंगायत मठांबद्दल अनुद्गार काढल्यानंतर मोठा असंतोष पसरला आहे. वीरशैव महासभा तसेच इतर संघटनांनी त्यांच्या विधानांचा निषेध केला. सोमवारी शेतकरी संघटनांनी निदर्शने केली. दुष्काळ असताना शेतकऱ्यांना मदत करायचे सोडून अंगडी चुकीच्या कारणासाठी आपला वेळ वाया घालवत असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.
कर्नाटक राज्य रयत सेने आणि हसिरू सेने या कन्नड शेतकरी संघटनांनी अंगडी विरोधात दंड थोपटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी अंगडी यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी केली.
यामुळे अंगडी अडचणीत आले आहेत. नागणुर मठाची माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.