बेळगावात यशस्वी झालेल्या एक मराठा लाख मराठा मोर्चा नंतर लिंगायत समाजाचा क्रांती मोर्चा झाला हे झाल्यावर वाल्मिकी समाजाचा देखील मोर्चा बेळगावात काढण्यात येणार आहे.
माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वात बेळगावात वाल्मिकी समाजाचा क्रांती मोर्चा काढण्यात येईल अशी माहिती कर्नाटक राज्य वाल्मिकी समाजाचे नेते संतोष यांनी दिली आहे.
कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.वाल्मिकी समाजात नेत्यांची संख्या खूप आहे मात्र अनेकांनी फक्त स्वतःचाच विचार केलाय समाजाचं भल व्हावं असा विचार करणारे नेते खूप कमी आहेत. या अगोदर बंगळुर मध्ये वाल्मिकी संमेलन झालं होतं आता दुसरा मोर्चा बेळगावात होईल असं संतोष यांनी स्पष्ट केलं आहे.यावेळो जगदीश हुलीयाळ मारुती जलाले आदी उपस्थित होते.