नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार सुरेश अंगडी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बेळगावात लिंगायत समाजाच्या क्रांती मोर्चात सहभाग घेतलेल्या नागनुर मठाच्या स्वामींनी आपल्या मठाचे परिवर्तन मशिदीत करून घ्यावे अस वादग्रस्त वक्तव्य खासदार सुरेश अंगडी यांनी केलं आहे.
मी पहिला भारतीय आहे नंतर हिंदू आहे नागनुर स्वामीजींनी लिंग धारणा केली आहे परवाच्या मेळाव्यात स्वामीजींनी लिंगायत हिंदु नव्हेत अशी मागणी केली होती जर का त्यांना हिंदू धर्म नको असेल तर आपलं मठ मशिदीत परिवर्तित करून घ्यावे असा सल्ला देखील दिला आहे.
अंगडी यांच्या वक्तव्या नंतर नवीन वाद उफाळला असून लिंगायत समाजाच्या दृष्टिकोनातून राजकारण सुरू झाले आहे.
महाराष्ट्रात एक मराठा लाख मराठा ,गुजरात मध्ये पटेल आंदोलन,हरियाणा जाट तर राजस्थान मध्ये गुर्जर आंदोलन हे तर आता कर्नाटकात लिंगायत हे काँग्रेस ने करायला लावलेलं आंदोलन आहे असा देखील त्यांनी आरोप करत बेलगावतील लिंगायत समाज आंदोलन हे काँग्रेस आयोजित होत असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
पुढील वर्षी होणाऱ्या विधान सभेच्या पाश्वभूमीवर लिंगायत वोट बँक कब्जा करण्यासाठी भाजप कॉंग्रेस दोघांनी प्रयत्न चालवले आहेत भाजप ची लिंगायत वोट बँक फुटेल काय कॉंग्रेस लिंगायत मत घेतंय का हे पाहावे लागेलच मात्र लिंगायत वेगळा धर्म मागणी यात राजकारणाचा नक्कीच शिरकाव झाला आहे.
अंगडी यांनी केलेलं विधान योग्यच आहे, कारण लिंगायत समाज हा हिंन्दुच आहे. आणि त्यांची स्वतंत्र धर्माची मागणी हि बसवेश्वरांचा अपमान आहे