पुण्या नंतर लोकमान्य टिळकांनी बेळगावात सुरू केलेल्या झेंडा चौक गणेश मंडळाला 113 वर्ष पूर्ण

0
 belgaum

बेळगावातील गणेश उत्सवाला ऐतिहासिक  परंपरा असून इथे  मोठ्या उत्साहात  हा सण साजरा  केला जातो. पुणे शहरानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकानी १९०५ साली बेळगावातील सार्वजनिक गणेश  उत्सवाची  सुरुवात केली होती  देशातील सर्वात जुने  दुसरे सार्वजनिक गणेश मंडळ आजही बेळगावात कार्यरत असून त्याची मुहूर्त मेढ टिळकांनी बेळगावात रोवली होती .

old-marfket

bg

रविवारी पेठ मधील व्यापारी कैलास वासी  वामनराव  कलघटगी ,  गोविंदराव याळगी,  शामराव पाटणेकर या तीन  व्यापार्यांनी १९०५ मध्ये झेंडा चौकात  सार्वजनिक गणेश मंडळाची मुहूर्त मेढ केली होती या  कार्यक्रमाला लोकमान्य  टिळक   होते आणि त्यांनी बेळगावात सार्वजनिक गणेशाचा पाया रोवला.

झेंडा  चौकातील सार्वजनिक गणेश मंडळ हे   देशातील  सर्वात जुने मंडळ आहे  ज्या ला या वर्षी १०८ वर्षे पूर्ण झाली आहेत . बेळगाव हे शहर ब्रिटीशांच्या काळातील बॉम्बे  प्रेसिडेन्सी मधील व्यापाराचे एक मुख्य केंद्र होते  . आज बेळगाव  शहरातील हे  झेंडा  चौक  गणेश  मंडळ  बेळगाव शहरातील  एक आदर्श गणेश मंडळ म्हणून  समोर आल आहे आणि लोकमान्यांचा वारसा   पुढे नेत आहे .

बेळगाव  शहरात आज  एकूण ३८० सार्वजनिक  गणेश मंडळ आहेत त्यापैकी  रविवार पेठ गणेश मंडळाला 111 वर्ष , मारुती गल्लीतील गणेश मंडळाला 110  तर कामत गल्लीतील गणेश मंडळाला 105 वर्ष पूर्ण झाली आहेत  एकूण १००  हुन अधिक वर्ष झालेली 5 मंडळ आहेत . लोकमान्य टिळकांनी  १९०५ मध्ये  लावलेल्या  रोपट्याचं वट  वृक्षात  रुपांतर झालं आहे आणि  दरवर्षी   हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होत आला आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.