Saturday, May 4, 2024

/

स्मार्ट बेळगावचा काळा मंगळवार

 belgaum
Tuesday तीन वेगवेगळ्या घटनांत तीन जणांचे खून आणि एका युवकाची रेल्वेखाली झोकून आत्मह्त्या मुळे मंगळवार हा दिवस शहरासाठी घात वार ठरला आहे   वृद्ध भावाकडून दोघा संख्या लहान भावांचा खून आणि बहिणीला छेड काढणाऱ्या तरुणाचा भावाकडून खून तसेच दुसऱ्या रेल्वे गेट जवळ तरुणाची रेल्वे खाली झोकून आत्महत्त्या या घटनांनी  घटनामुळे स्मार्ट बेळगावला आजचा दिवस काळा मंगळवार ठरला आहे .
रेल्वे ट्रक बनला सुसाईड झोन
या वर्षी गेल्या सात महिन्यात बेळगाव रेल्वे ट्रक वर २६ जणांनी आत्महत्त्या केलाय आहेत यात मंगळवारी आणखी एकाची भर पडली. मंगळवारी सकाळी दुसऱ्या रेल्वे गेट जवळ सचिन जोतिबा लोहार वय 22 खानापूर रोड कॅम्प बेळगाव  या युवकाने आत्महत्त्या केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गेट बंद असतेवेळी फोन वरून बोल्ट पळत येऊन त्याने धावत्या गाडी खाली झोकून देऊन आत्महत्त्या केली आहे. मात्र याचनेमके कारण समजू शकले नाही .
विवाहित बहिणीची छेड काढणाऱ्याचा भावाकडून भोसकून खून
विवाहित बहिणीला फोन करून नाहक तास देत छेडछाड़ करणाऱ्या एका युवकाचा भावाने चाकूने भोसकून खून केल्याची घटना मंगळवारी स्कॅलिऊ एकाच्या दरम्यान गोवावेस कार्पोरेशन कॉम्पलेक्स जवळ घडली आहे . हसनसाब मलिकसाब नदाफ वय २६ वर्ष रा सुळेभावी असं या खून झालेल्या युवकाचे नाव आहे . या प्रकरणी ओमकार बाबू पोटे वय २०  रा पवार गल्ली शहापूर यास अटक करण्यात आली आहे
टिळकवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हसनसाब हा गोवावेस जवळील एका सोलार फिटिंग दुकानात कामास होता याच दुकानात काही महिन्या पूर्वी ओमकार ची विवाहित बहीण कामाला होती काही दिवसापूर्वी ओमकार च्या बहिणीचे लग्न झाले होत तरी देखील हसनसाब हा रात्री अपरात्री बहिणीला फोन करून त्रास करत होता त्यामुळे मंगळवारी ओमकार हा गोवावेस जवळ हसनसाब जाब विचारायला गेला होता दोघांच्या हाणामारी झाली त्यावेळी ओमकार ने चाकूने हसन साब याच्या पोटात वार केला यात त्याचा मृत्यू झाला आहे . टिळकवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून उद्यमबाग पोलीस निरीक्षक निरंजन पाटील अधिक तपास करत आहेत
गांधी नगर ब्रिज जवळ डबल मर्डर
संपत्तीच्या वादातून सख्या मोठ्या वृद्ध भावाने आपल्या  दोघं लहान भावांचा विळ्याने वार करून दिवसा  ढवळ्या खून केल्याची घटना मंगळवारी  सकाळी साडे अकराच्या सुमारास  घडली आहे . मोहम्मद एस मुल्ला वय ५४ वर्ष  तर गौस एस मुल्ला वय ४२ वर्ष दोघेही राहणार अलारवाड  अशी दोघा मयत झालेल्या भावांची नाव आहेत .मोठा भाऊ असलेल्या आरोपी रसूल मुल्ला (६२) यास पोलिसांनी अटक केली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आलारवाड येथील मुल्ला परिवारात संपत्ती साठी भावा भावात वाद होता मंगळवारी सकाळी ते तिघेही गांधी नगर ब्रिज जवळ एकमेका समोर आले त्यावेळी हा प्रकार घडला आहे  या घटनेवेळी या तिन्ही भावांची आई देखील हजर होती तिच्या समक्ष ही घटना घडली आहे.
असा झाला खून
सुरुवातीला रसूल आणि महम्मद यांच्या शाब्दिक चकमक झाली त्यावेळी आरोपी रसूलने धारधार विळ्याने महम्मद वर वार केले त्यावेळी शेजारी असलेलत्याचा भाऊ गौस हा महम्मद वाचवायला गेला त्याच्या वर देखील वार करून घटनसातलीच ठार केले . यावेळी झालेल्या झटापटीत मयत भावांनी प्रतिकार केल्याने रसूल देखील जखमी झाला आहे . हा सगळा  प्रकार या तिन्ही मुलांची वृद्ध आई समक्ष घडला होता . दोघं भावांचे रक्त रस्त्यावर पडलं होता घटना स्थळी बघ्यांची गर्दी झाली होती  . पोलीस उपायुक्त सीमा लाटकर अमरनाथ रेड्डी सह माळ मारुती निरीक्षक चन्नकेशव टेंगरीकर यांनी धाव घेऊन पाहणी केली होती.
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.