बेळगाव महापालिकेने महापौर कक्षाच्या नूतनिकरणासाठी १५ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, साधारणपणे १४९९९८५.१८ रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
वारंवार सूचना करूनही सुधारणा न झाल्याने मागील आठवड्यात महापौर संज्योत बांदेकर यांनी आपला कक्ष सोडून गटनेत्यांच्या कक्षात आपले कामकाज सुरू केले होते.यानंतर तातडीने काम हाती घेण्यात आले आहे.
सुधारणा कामात छत दुरुस्ती, इलेक्ट्रिक वायरिंग, कार्पेट, खुर्ची आणि नवे टेबल तसेच नूतन वातानुकूलन व्यवस्थेचा समावेश असेल