Thursday, December 26, 2024

/

स्वातंत्र्यदिनी आणि गणेश उत्सवाला बेळगाव बंगळुरू साठी विशेष रेल्वेची सोय

 belgaum

यावर्षीचा स्वातंत्र्यदिन आणि गणेश उत्सवाच्या निमित्ताने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता बेळगाव बंगळुरू दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे गाड्यांची सोय करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी 11 आगष्ट रोजी रात्री 8:15 वाजता ट्रेन नंबर 06518 यशवंतपुर(बंगळुरू) हुन बेळगाव कडे निघणार असून 12 आगष्ट रोजी शनिवारी सकाळी 8 :10 वाजता बेळगावला पोचणार आहे.तर ट्रेन नंम्बर 06582 बेळगाव यशवंतपुर(बंगळुरू) मंगळवार 15 आगष्ट रोजी सायंकाळी 7:15 वाजता बेळगाव हुन निघणार असून बुधवारी सकाळी 6:20 वाजता यशवंतपूर ला पोचणार आहे.Spl train 15 augगणेश चतुर्थी बंगळुरू बेळगाव स्पेशल ट्रेन 06583 ही गुरुवारी 24 आगष्ट रोजी रात्री 8:15 वाजता यशवंतपूर हुन बेळगावकडे निघणार असून शुक्रवारी 25 आगष्ट रोजी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी बेळगावला पोहचेल तर ट्रेन नंम्बर 06584 बेळगाव यशवंतपूर रविवारी 27 आगस्ट रोजी सायंकाळी 7 :20 बेळगाव हुन बंगळुरू कडे प्रयाण करणार असून सोमवारी सकाळी 5 वाजता यशवंतपूर ला पोहोचनार आहे.

ऐन सण आणि सुट्ट्यांच्या काळात बेळगाव हुन बंगळुरू मुंबई कडे ये जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या अधिक असते ज्या नियमित ट्रेन आहेत त्या फुल्ल असल्याने खासगी बस 1500 रुपये पर्यंत अवाढव्य तिकीट दर आकारात आहेत याचा फटका सामान्य लोकांना बसत आहे.

Spl train ganesh
15 आगस्ट आणि गणेश चतुर्थी विशेष रेल्वेचा दर सामान्य लोकांना परवडण्या सारखा आहे त्यामुळं रेल्वे खात्याने खास गाड्या केल्याने प्रवाश्यातून समाधान व्यक्त केलं जातं आहे.

सतीश तेंडुलकरांच्या प्रयत्नांना यश

बंगळुरू मुंबई कडे ये जा करणाऱ्या प्रवाश्यानी अनेक तक्रारी केल्या नंतर सिटीजन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी गेल्या 20 दिवसापासून दक्षिण पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे कडे या विशेष गाडया सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले होते ज्यादा गाड्या बंगळुरू आणि मुंबई सुरू करा अशी मागणी केली होती. यशवंतपूर बेळगाव विशेष गाड्या सुरू करण्याची रेल्वे स्थानिक सदस्य अरुण कुलकर्णी यांनी तेंडुलकर यांना सहकार्य केले आहे.

बेळगाव मुंबई साठी देखील विशेष गाड्यांची मागणी तेंडुलकर यांनी मध्य रेल्वे कडे केली होती मात्र गणपती मुळे कोंकण रेल्वे सर्व गाड्या आरक्षीत असल्याने बेळगाव मुंबई स्पेशल ट्रेन सुरू होण्यास अडचण येत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.