खासदार सुरेश अंगडी यांनी बोलावलेल्या स्मार्ट सिटी विकास कामांच्या बैठकीत शहरातील ट्रॅफिक समस्येबद्दल जोरदार चर्चा करण्यात आली. शहरातील पार्किंग आणि ट्रॅफिक समस्या जोरदार चर्चा झाली.
बैठकीत बोलताना गुन्हा विभागाचे डी सी पी म्हणाले की’शहरात परिसरात 4.60 लाख वाहन आहेत दररोज 5 ते 6 हजार वाहन शहरात प्रवेश करत असतात याचा सगळ्याचा ताण शहरातील ट्रॅफिक वर पडत आहे. शहरातील ट्रॅफिक वर नियंत्रण ठेवण्यासाठी रिंग रोड ची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग लॉट तयार करा अशी सूचना त्यांनी केली. पोलीस दलाने आपल्या परीने ट्रॅफिक नियंत्रण साठी 90 एच डी सी सि टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
ए सी पी ट्रॅफिक शंकर मारिहाळ यांनी कॉलेज परिसरात खास करून कॉलेज रोड वर विध्यार्थ्यानी कॉलेज प्रिमाय सिस मध्येच पार्किंग करावी त्यामुळं ट्रॅफिक नियंत्रण व्यवस्थित होईल अशी सूचना केली