प्यास फौंडेशनच्या वतीनं एका दिवसात तबबल 15 हजार झाडे लावण्यात येणार असून रविवार 9 जुलै रोजी “एक दिवस बेळगाव” साठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. आमचं बेळगाव ग्रीन बेळगाव व्हावं यासाठी प्यास फौंडेशन च्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बेळगाव शहराला पूर्वीच गत वैभव मिळाव यासाठी शहराला ग्रीन बेळगाव बनवण्यासाठी खालील ठिकाणी रोपटी लावण्यात येणार आहेत.
1) 40 महा पालिकांच्या खुल्या जागेत
२)शहरातील सर्व रस्त्यांच्या डिवाईडर मध्ये
3) शहरातील सार्वजनिक उध्यानात ही वृक्षांची लागवड केली जाणार आहे. शहर हिरवं करण्यासाठी एक चांगली संधी असून 100 हुन अधिक संघटना नी पालिकेच्या खुल्या जागेत वृक्षारोपण करण्याची जबाबदारी घेतली आहे.
के एल ई च्या मदतीने प्यास रस्त्यांच्या डिवाईडर मध्ये रोपटी लावणार आहेत तर जनतेने आपल्या घरा जवळच्या गार्डन मध्ये एक झाड लावावं ते दत्तक घ्यावं त्याला आपल्या नावाचा फलक देखील लावू शकता त्याचा सांभाळ करावा . जर तुम्ही अपार्टमेंट मध्ये राहत असाल तर जवळच्या महा पालिकेच्या गार्डन किंवा खुल्या जागेत तुम्ही झाड दस्तक घेऊ शकता विचार करा पक्का निसर्गा साठी झाडे लावा .
ही झाड झाडे वन विभाग तर खत तुम्हाला महा पालिका देईल. शहरातील जास्तीत जास्त लोकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं ग्रीन बेळगाव करावं असं आवाहन प्यास फौंडेशन च्या वतीनं डॉ माधव प्रभू यांनी केल आहे.
संपर्क-
प्यास फौंडेशन किरण-09742667777
महा पालिका हलगी अभियंता-09844220790
फॉरेस्ट कडोळकर आर एफ ओ –09483421408
व्ही के महेश 08050422500