बेळगावात 3 कोटी 11 लाखांचा जुन्या नोटा जप्त
.500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्या असल्या तरी अजूनही लोकांकडे या जुन्या नोटांचा संग्रह आहे हे बेळगावातील कारवाई मूळ दिसून आलं आहे. शहर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका लॉज मधून 3 कोटी 11 लाखांच्या जुन्या नोटा जप्त केल्या असून पुणे मुंबई येथील सहा जणांना अटक केली आहे या जप्त केलेल्या जुन्या नोटांतून 500 रुपयांच्या 80%तर 1000 रुपयांच्या 20% टक्के नोटा आहेत.
शहरातील रामदेव सर्कल जवळील रोहन रेसिडनसी या लॉज मधील रूम नंम्बर 204 मधून ही करन्सी ठेवली असल्याची माहिती मिळताच डी सी पी अमरनाथ रेड्डी आणि सी सी बी निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी धाड टाकून 3 कोटी 11 लोकांच्या नोटा आणि 6 जणांना अटक केली आहे.
सांगली गोवा आणि पुणे येथील या सर्व अटक केलेल्यानी जुन्या नोटा बदलून नवीन नोटा मिळवण्यासाठी आणले होते रिजर्व बँकेच्या माध्यमातून गुजरात चया अनिल पटेल नामक व्यक्तीने नोट बदलून देतो अस सांगितल्यावर या जुन्या नोट आणल्या होत्या. अरविंद तलवार(गोवा) सुहास पाटील(पुणे) रामा पाटील(हलगा बस्तवाड बेळगाव) सदरोद्दीन शेख(मिरज)अनिल पटेल(गुजरात)अब्दुल नाशिर पाशा (भटकळ)अशी अटक केलेल्यांची नाव असून ते पुणे मुंबई गोवा सांगलीचे आहेत. डी सी पी सीमा लाटकर, डी सी पी अमरनाथ रेड्डी,ए सी पी शिवकुमार, गुन्हा ए सी पी कल्याण शेट्टी, निरीक्षक कालिमिर्ची, निरीक्षक गड्डेकर उपास्थित होते