आज बेळगावात विणकरांना मोठा मोर्चा काढला. यंत्रमागावर बनवल्या जाणाऱ्या साडीवर जाचक जीएसटी बसवण्याचा निर्णय मोदी म्हणजेच भाजप सरकारने घेतलाय, या निर्णयाला विरोधाचा हा मोर्चा झाला, बेळगावच्या जनतेने पाठिंबा दिला, या मोर्चात भाजप नेते दिसले नाहीत, यामुळे विणकर त्यांना त्यांची जागा दाखवणारच म्हणून भाजपची झोप उडाली आहे.
काहीतरी कारण काढून खोटी आश्वासनं देऊन भाजप नेत्यांनी हा मोर्चा होऊ नव्हे म्हणून प्रयत्न केले होते.तरीही तो झाला कारण विणकर वर्गाच्या पोट पाण्याचा मुद्दा आहे, या वातावरणात जर पाठिंबाही दिला नाही तर यापुढे मतांसाठी विणकरांच्या दारात जाणे अवघड होईल हे भाजपच्या नेत्यांना माहीत आहे, खरं विरोध केला तर भाजप कारवाई करील ही भीती पण असणार, यामुळे ते येऊ शकलेले नाहीत.
अशा वातावरणात भाजपला मोठा तोटा होणार हे नक्की आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघामध्ये भाजप ची मते म्हणून काहीजण विणकरांच्या मतांना म्हणत होते, तरीही यावेळी ते समीकरण उरणात नाही हे या मोर्चाने दाखवून दिले आहे.
शेतकरी, कामगार, भ्रष्टाचार निर्मुलन संघटना आणि कापड व्यापारी हे सगळे विणकरांच्या मागे थांबले आहेत, यावरुन आता विणकर मत विभागून तिसर्यालाच फायदा होणार आहे आणि भाजपचे नुकसान होणार आहे.