यावर्षीच्या गणेशउत्सवादरम्यान येणाऱ्या अडचणीसंदर्भात महापौर संज्योत बांदेकर यांच्याशी मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली, यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान आमदार संभाजी पाटील, सरचिटणीस महादेव पाटील, उपाध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील,मदन बामणे,प्रकाश शिरोळकर, जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, चिटणीस गणेश दड्डीकर,महापालिकेचे अभियंता आर एस नाईक,लक्ष्मी निपाणीकर, यांनी चर्चेत भाग घेतला.सुरुवातीला सरचिटणीस महादेव पाटील यांनी आजच्या बैठकीत महामंडळाची भुमिका स्पष्ट करून सविस्तर निवेदन वाचून दाखविले .
यावर बोलताना आमदार संभाजी पाटील म्हणाले की आर एस नाईक आणि लक्ष्मी निपाणीकर या दोन्ही अधिकाऱ्यांना बेळगावची संपूर्ण माहिती आहे, तेंव्हा तुमच्या माध्यमातून तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना द्यावी,व आजपर्यंत नांदत आलेली शांतता भंग पावू नये.
बेळगावच्या लोकसंख्येचा आणि सार्वजनिक मंडळांचा विचार करून,प्रशासनाने देखील फक्त शाडूच्या मुद्यावर अडून न रहाता पीओपी ला तुम्ही आडकाठी करू नये, कारण बेळगाव शहरात वाहत्या पाण्यात किंवा सार्वजनिक विहिरीत गणपती विसर्जन होत नाही, तर महापालिकेने बांधलेल्या कुंडामध्ये विसर्जन होते हे लक्षात घ्या असे सांगितले.
यावर महापौर संज्योत बांदेकर म्हणाल्या की मी ताबडतोब जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून याची कल्पना देतो असे सांगितले.यावेळी मोहन कारेकर, शिवराज पाटील, मोतेश बारदेशकर,किशोर मराठे, विशाल गौंडाडकर, सचिन केळवेकर, दत्ता जाधव, सुनील देसुरकर, सुरेश जाधव, अजित कोकणे, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.