मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विभागवार बैठका घेण्याचा निर्णय आज आमदार संभाजी पाटील यांच्या कॅम्प येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी आमदार संभाजी पाटील होते.
प्रास्ताविक विकास कलघटगी यांनी केले,
यावेळी विजय जाधव आणि हेमंत हावळ ,महादेव चौगुले, विजय चौगुले यांनी काही सूचना केल्या,
त्याला आमदार संभाजी पाटील, रणजित चव्हाण पाटील,मदन बामणे यांनी आलेल्या सूचनांची दखल घेऊन विभागवार बैठका घेऊन कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेऊया असे सांगितले.
यावेळी महादेव पाटील, रमाकांत कोंडुसकर, गणेश दड्डीकर,शिवराज पाटील,रवी कलघटगी, मोहन कारेकर, महेश शहापुरकर व अनेक मंडळांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते
बातमी सौजन्य-महादेव पाटील
