Friday, January 24, 2025

/

अधिकारी विरुद्ध महापौर संघर्ष शिगेला-गटनेत्यांच्या कक्षातून चालवता हेत कामकाज

 belgaum

sanjyot bandekar 1सोमवारी महा पालिका बैठकीतील अधिकारी विरुद्ध महापौर नगरसेवक यांच्यातला प्रोटोकॉल मान सन्मानाचा संघर्ष मंगळवारी आता चक्क शिगेला पोचला असून अनेकदा सूचना करून देखील अधिकारी महापौरांचं ऐकत नसल्यानें महापौर संज्योत बांदेकर यांनी आपला कक्ष सोडला आहे. कौन्सिल सेक्रेटरी यांना अनेकदा सूचना देऊन देखील त्यांच्या कक्षातील असुविधा दूर न केल्याने महापौरांनी आपला कारभार पहिल्या मजल्यावरील गट नेत्यांच्या चेंबर मधून सुरू केला आहे. पालिका आयुक्त शशीधर कुरेर कौंसिल सेक्रेटरी लक्ष्मी निप्पणीकर यांना महापालिका कक्षाची देखभालीची जबाबदारी असलेले अभियंते रमेश न्यामगौडर यांना सूचना देऊन महापौर बांदेकर यांनी आपला कक्ष सोडला आहे.
या अगोदर अनेकदा सूचना देऊन सुद्धा टेबल बेल न दिल्याने उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी स्टोर कार्यलयास टाळ ठोकण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आता महापौरांनी आपला कक्ष सोडल्याने मुजोर अधिकारी विरुद्ध नगरसेवक असा संघर्ष निर्माण झाला आहे.

बेळगाव पालिकेत नगरसेवक महापौरांच्या शब्दाला किंमत देत नाहीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं गट नेते जेष्ठ नगरसेवकांना विश्वासात घेऊन कक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महापौर संज्योत बांदेकर यांनी बेळगाव live शी बोलताना दिलो आहे.

कक्षातील असुविधा दूर न केल्याने कक्ष सोडण्याची घटना पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली असून अधिकाऱ्यांची नाचक्की झाली आहे. मेयर कक्षातील ए सी दुरुस्त न केल्याने महापौरांनी कक्ष सोडला आहे अधिकाऱ्यांच्या मनमानी पणा मुळे माजी महापौर सरिता पाटील आणि उपमहापौर संजय शिंदे यांनी नवीन गाडी साठी शस्त्र उगारले होते. एकूणच अधिकारी विरुद्ध लोक प्रातिनिधी हा संघर्ष पालिकेत उफाळला असून मुजोर अधिकाऱ्यांना सर्वांनी मिळून वठणीवर आणा अशी मागणी जनतेतून होत आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.