Tuesday, January 7, 2025

/

जय महाराष्ट्र बस बेळगावात तयार होणार!

 belgaum

कर्नाटकाचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी केलेल्या वक्तव्या वरून बराच गदारोळ माजला होता आणि बेळगावातील सामान्य मराठी माणसाची असलेली जय महाराष्ट्र ही घोषणा पुन्हा एकदा चर्चेत आली होती.

महाराष्ट्र शासनाने प्रत्येक बस वर जय महाराष्ट्र लिहिलेल्या नवीन लोगोच अनावरण केल होत अश्या ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या नवीन बस आता चक्क बेळगावात तयार होणार आहेत. बेळगाव जवळील देसुर इथल्या अल्मा मोटर्स या बस गाड्या तयार करणाऱ्या कंपनीत महाराष्ट्र शासनाच्या नवीन ‘शिवशाही’ बस  बनविल्या जाणार आहेत.

jm bus alma motors 1

अल्मा मोटर्स या कंपनीत सध्या जय महाराष्ट्र बनविलेल्या दोन बस बनविल्या असून याच कंपनीला महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या ’शिवशाही’ बस तयार करण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे.अल्मा मोटर्स ने दोन शिवशाही बस तयार केल्या असून लवकरच महाराष्ट्र शासनाच्या एस टी महा मंडळाच एक शिष्टमंडळ बेळगावला येऊन बस ची पहाणी करून याच कंपनीला नवीन ५०० बस तयार करण्याचे कंत्राट देण्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बेळगावातील अल्मा मोटर्स  या कंपनीत तयार केली जाणारी प्रत्येक बस वर देखील जय महाराष्ट्र लिहील जाणार आहे .

jm bus alma mtors 2

महाराष्ट्रातील एका मोठया राजकीय नेत्याच्या नातलगांची अल्मा मोटर्स कंपनी असून या कंपनीत श्रीलंका आणि इथोपिया या विदेशी परिवहन मंडळांच्या च्या बस देखील तयार होत असतात आता जय महाराष्ट्र च्या लोगो असणाऱ्या 500 बस तयार होणार आहेत.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.