घरा शेजारी असलेल्या अपार्टमेंट मध्ये ट्युशन ला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेडछाड करणाऱ्या एक इसमास नागरिकांनी चोप दिल्याची घटना गुडसशेड रोड येथे घडली आहे.
बसवराज संगप्पा चितळी वय 32 वडगांव अस या इसमाच नाव असून त्याला खडे बाजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
या प्रकरणी समजलेल्या माहिती नुसार दोघी सात वर्षीय मुली आपल्या घरा शेजारील अपार्टमेंट मध्ये ट्युशनला जात असतेवेळी दारू च्या नशेत असलेल्या बसवराज याने पाठलाग करून छेडछाड केली इतकंच नाही तर ट्युशन संपवून घरी परतते वेळी देखील पाठलाग केला
छेडछाड केली सदर मुलीने रडत घरी येऊन सगळी घटना सांगितल्यावर गल्लीत जमलेल्यानी बसवराज याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केलं.