Thursday, January 9, 2025

/

आवाज फक्त सायनाकांचा

 belgaum

बेळगाव महा पालिकेतील सर्वसाधारण सभेत माजी महापौर आणि नगरसेवक किरण सायनाक यांनी अधिकाऱ्यांना अनेक प्रश्न उपस्थित करून भंबेरी उडवून सोडली होती सायनाक यांच्या रुद्र अवतारामुळे बैठकीत फक्त त्यांचाच आवाज होता. गेली चार वर्षे प्लस मायनस राजकारणात कमी पडलेल्या किरण सायनाक यांनी आपल्या बैठकीच्या एका दिवसातील नेतृत्व गुणामुळे सगळयांना प्रभावित केलं आहेच या शिवाय अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्यात ते यशस्वी झाले होते .

City corporationbelgaum

बैठकीत अनेक मुद्द्यावर किरण सायनाक अधिकाऱ्यांना कोंडीत पकडत होते अधिकारी निरुत्तर होत होते . आमदार फिरोज सेठ आणि संभाजी पाटील हे राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानासाठी बंगळूरू गेले होते त्यांच्या गैर हजेरीत किरण सायनाक वन मॅन आर्मी प्रमाणे अधिकाऱ्यांची  खबर घेत होते .

गोगटे सर्कल ते तिसरे रेल्वे गेट रस्ता केवळ एका खासदारांच्या फोन केल्यामुळे दुरुस्त केला जातो मग ५८ नगरसेवकांनी सांगितल्यावर काय केलात असा प्रश्न करत अभियंत्या लक्ष्मी निप्पानिकर यांना चांगलेच धारेवर धरले होते . आंबेडकर स्मारक उदघाटन वेळी महापौरा ना प्रोटोकाल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी अक्षरशा सळो कि पळो करून सोडले होते . अभियंता आर एस नाईक यांना इमारतींना नवीन परवाना देणे या विषयवार कोंडीत पकडेल होते एकूणच किरण सायनाक हे एक अभ्यासू नेतृत्व म्हणून समोर आले होते .

 

kiran saynaak

अनकेदा त्यांच्या वर किरण( जारकीहोळी) अशी टीका झाली आहे मात्र आजचा दिवस वेगळा होता सर्व नगरसेवकांना आपले अधिकार मिळवून देण्यासाठी , बेळगावातील मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी सायनाक यांनी अशी भूमिका कायम घेणे आणि असले नगरसेवक आणखी सत्ताधारी आणि विरोधी गटात नगरसेवक असले पाहिजेत. समितीचे माजी आमदार कै बळवन्तराव सायनाक आणि किरण सायनाक यांची तुलना होऊ शकत नाही पणकिरण सायनाक( जारकीहोळी)यांनी  अशी कामं केल्यास जुनी बिगडलेली इमेज सुधारू शकते यात तीळ मात्र शंका नाही .

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.