‘तारुण्यपिटिका’ हा खरंतर सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय.चेहेऱ्यावरच्या पुटकुळ्या, मुरुमे, काळे डाग, खड्डे यांमुळे कितीतरी तरुण-तरुणी हैराण झालेले दिसतात.
सामान्यपणे पौगंडावस्थेत बदलणा़ऱ्या हार्मोन्स् मुळे तारुण्यपिटीका तयार होत असल्या, तरी केसातील कोंडा, अतिस्निग्ध त्वचा, पाळीची अनियमितता, आहाराच्या – झोपेच्या बदलत्या वेळा, दैनंदिन तणाव, प्रदूषण, पोषक आहाराचा अभाव अश्या अनेक कारणांमुळे तारुण्यपिटीका अगदी तीस-पस्तीस वयाच्या स्त्री-पुरुषांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. तारुण्यपिटीका जवळजवळ सर्वांनाच येतात. चेहऱ्यावर आलेल्या प्रत्येक पुळीला उपचारांची गरज असतेच असे नाही. काहींच्या या पुळ्या येतात आणि आपोआप जातात. काहींच्या पुळ्या मात्र एकामागोमाग एक येतच राहतात. कपाळ, नाक, गाल अगदी मान, गळा, पाठीवरदेखील या पिटीका येतात. आलेली पुळी बरी होण्याच्या आतच नवीन पुळी तयार होते. चेहरा काळवंडतो. त्वचेवर खड्डे तयार होतात. अनेकदा या पुळ्यांमध्ये पू तयार होतो आणि त्या दुखू लागतात. बरेचदा पाळी येण्याआधीच्या काही दिवसांत पुळ्यांची संख्या वाढते.
‘तारुण्यपिटीकांसाठी खास’ तयार केलेले साबण, ‘फेसवॉश’, मलमे, क्रीम्स् यांचा विशेष उपयोग होताना दिसत नाही. दिवसेंदिवस त्वचा निस्तेज, काळपट आणि मुरुमांनी भरलेली पाहून आत्मविश्वास कमी व्हायला लागतो.
वास्तविक, तारुण्यपिटीकांची निर्मिती प्रक्रिया जरी सारखीच असली तरी प्रत्येकाची कारणे निरनिराळी असतात.
ज्यांच्या केसांत जास्त प्रमाणात कोंडा असतो, त्यांच्या चेहेऱ्यावर आणि मान्, पाठीवर पुळ्या येतात.
केवळ एन्टीडॅन्ड्रफ शॅम्पू वापरून कोंडा कमी होत नाही. त्यासाठी ‘शिकेकाई, रिठा, आवळा, मेंदी, जटामांसी, नागरमोथा’ या वनस्पतींची भरड पाण्यात उकळून गाळून या पाण्याने आठवड्यातून दोनदा केस धुवावेत. केस धुण्यापूर्वी तासभर आधी केसांच्या मुळांशी खोबऱ्याच्या किंवा बदामाच्या तेलाने हलका मसाज करावा. केस धुण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात क्षार असू नयेत.ब, क, ड, ई या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे त्वचेचे विकार बरे होण्यास वेळ लागतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने ही जीवनसत्वे घेता येतात
तारुण्यपिटीका आणि आहार:
कोरडे पदार्थ टाळा: बेफर्स, चिप्स्, कोरडी पोळी भाजी, चटणी पोळी असे कोरडे पदार्थ सतत खात राहिल्यास त्वचा कोरडी पडते, काळवंडते.
स्निग्ध पदार्थ जपून घ्या: समोसे, भजी यासारखे तळलेले (डीप फ्राईड) पदार्थ, शेंगादाणे, खोबरे, डालडा, अतिप्रमाणात तूपकट पदार्थ टाळा
तिखट, खारट पदार्थ कमी करा: अतिप्रमाणात मसाले, लोणची, अतिरिक्त मीठ म्हणजे त्वचाविकारांना निमंत्रण!
पाळी नियमित आहे ना? खूप पिंपल्स् आणि अनियमित पाळी, वाढलेले वजन यांचा संबंध पी. सी. ओ. डी. सारख्या आजारांशी असू शकतो. अशी लक्षणे असतील तर त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या.
आहारात भरपूर पाणी, ताजी फळे, रात्रभर पाण्यात भिजवलेले ४-५ बदाम, काळ्या मनुका, आक्रोड, अंजीर, डाळिंब यांचा समावेश असावा.फेस वॉश, शॅम्पू, फेसपॅक सारखे बदलू नयेत.डाॅ सरनोबत क्लिनिक उपचार
होमियोपॅथी बरोबरच डाॅ सरनोबत यांची खास बनवलेली सौंदर्य प्रसाधने देखीलपिंपल्स व्यवस्थीत ट्रिट करण्यास मदत करतात.क्रिमस, फेसपॅक, फेसवाॅश, स्क्रब यांनी त्वचा देखणी व तजेलदार बनते.