Sunday, January 5, 2025

/

डी सी पी सीमा लाटकर यांनी स्वीकारला पदभार

 belgaum

dcp sima latkar belgaumबेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयाच्या तिसऱ्या पोलीस उपायुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सीमा लाटकर यांनी आपला पदभार स्वीकार केला आहे .

पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांनी लाटकर आयांना आपला पदभार सोपविला आहे. यावेळी गुन्हा डी सी पी अमरनाथ रेड्डी उपस्थित होते. डी सी पी जी राधिका यांच्या बदली नंतर  सीमा लाटकर यांची बेळगाव पोलीस आयुक्त पदी नियुक्त करण्यात आली होती .

बेळगावच्या नूतन पोलिस उपायुक्‍त म्हणून लवकरच रूजू झालेल्या  सीमा अनिल लाटकर या निपाणीतील आरोग्य खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी उमेश लाटकर व सेवानिवृत्त शिक्षिका कमल लाटकर यांच्या स्नुषा आहेत. बंगळूर येथील लोकायुक्‍त एसपी पदावरून सीमा लाटकर यांची बेळगाव येथे बदली झाली आहे .

धारवाड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेंजर भगवंत मिश्रीकोटी यांची सीमा ही मुलगी असून त्यांचे शिक्षण एमएससी कॉम्प्युटर सायन्स गोल्ड मेडॉलिस्ट झाले आहे. पोलिस दलात येण्यापूर्वी सीमा यांनी बंगळूर येथील निजलिंगाप्पा कॉलेज मध्ये लेक्‍चरर म्हणून काम पाहिले आहे. पोलिस दलात येण्याची संधी त्यांना कर्नाटकात निजद-भाजप चे संयुक्‍त सरकार असतांना मिळाली. त्यांनी बनशंकरी सब डिव्हीजन बंगळूर येथे एसीपी म्हणून उत्कृष्ठ सेवा बजाविल्याबद्दल येडियुराप्पा हे मुख्यमंत्री असतांना त्यांचा मुख्यमंत्री पदक देवून गौरव झाला आहे.

निपाणीतील उमेश लाटकर यांचे द्वितीय सुपूत्र अनिल यांच्याशी सीमा यांचा विवाह झाला असून अनिल हे देखील बीई एमबीए असून आयबीएन कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली असून पहिली आता बालवाडीत जात आहे. तर दुसरी लहान मुलगी आहे.

उमेश लाटकर यांच्या घराण्यात अनेक पदे आली आहेत. त्यांची कन्या सुनिता लाटकर यांनी निपाणीच्या नगराध्यक्षा म्हणून कार्य केले आहे. सद्या त्यांची मोठी सून निता सुनील लाटकर या निपाणी पालिकेत वॉर्ड क्र. 31 च्या नगरसेविका म्हणून कार्यरत आहेत. लहान सूनबाई बेळगावच्या पोलिस उपायुक्‍त झाल्याने लाटकर कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. वास्तविक सीमा यांना बेळगावचे पोलिस प्रमुखपद हवे होते. त्यासाठी त्यांचा प्रयत्नही सुरू होता. परंतू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांना उपायुक्‍तपदाची संधी दिली आहे.

सीमा लाटकर यांचे बंधू बंगळूरमध्ये हॉटेल मँनेजमेंट करून मोठे हॉटेल चालवित आहेत तर त्यांची बहिण अमेरिकेत सर्व्हिसला आहे. सीमा लाटकर यांच्यामुळे बेळगावला उच्चशिक्षित महिला पोलिस उपायुक्‍त लाभल्या आहेत.

 

Top of Form

Bottom of Form

14,723 people reached

 

Belgaum Live

362 Reactions30 Comments4 Shares

LikeShow more reactions

Comment

Share

Chronological

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.