आजच्या युगात १०० टक्के गुण मिळाले तरी विषय किती समजला हे महत्वाचे आहे पूर्वीच्या काळात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संस्था नव्हत्या मात्र आज चाटे सारखी नामांकित संस्था बेळगावात उपलब्ध आहे विध्यार्थ्यांच्या भविष्या साठी अश्या संस्था महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत असे मत दै तरुण भारतचे सी ई ओ दीपक प्रभू यांनी व्यक्त केले आहे.
चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन च्या वतीन इयत्ता आठवी ते बारावीच्या विध्यार्थ्यासाठी परीक्षा साठीचा सक्सेस फार्मुला या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केल होते यावेळी ते बोलत होते.मराठा मंदिराच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला होता चाटे समूहाचे कोल्हापूर विभागीय संचालक प्रा भारत खराटे ,प्रा सर्जेराव राउत, चन्नमा विद्यापीठाचे प्रा चंद्रकांत वाघमारे ,बेळगाव चाटे ग्रुप चे सुहास गुडाळे ,सुनिता गुडाळे, बाबुराव भोमान्नावर आदी उपस्थित होते.
चाटे कोचिंग क्लासेस बेळगावात सुरु झाल्याने याचा फायदा बेळगावातील विध्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षे साठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी होईल अस देखील प्रभू पुढे म्हणाले. चाटेग्रुप चे भारत खराटे आणि सर्जेराव राऊत यांनी अभ्यास स्पर्धात्मक परीक्षेतून कसा उपयुक्त ठरतो याची अनेक उदाहरण दिली.