गेली कित्येक महिने स्मशानातील दुरुस्तीसाठी मागणी करून देखील पालिका अधिकाऱ्यानी दुर्लक्षित केलेलं शेड दुरुस्तीच काम सुरू करण्यात आलं आहे. सदाशिवनगर स्मशान भूमीतील शेडाचे पत्रे गंजल्या मूळ नादुरुस्त झाले होते त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते अनेकदा महापौर आणि उपमहापौरानी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या तरी देखील कामाला सुरुवात झाली नव्हती .
शेड दुरुस्ती सोबत स्मशान भूमीतील एक बाजूची भिंत देखील पडली होती या साठी पालिकेच्या वतीनं 20 लाख अनुदान मंजूर करण्यात आले आहे. शनिवारी हे काम सुरू करण्यात आलं आहे. उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी अभियंत्यास काम त्वरित सुरू करा असा सज्जड दम देखील दिला होता. अखेर पालिकेच्या वतीनं स्मशान भूमी दुरुस्ती सुरू केली आहे