महापालिकेच्या वतीने शुक्रवारी शहरात तळ मजला आणि अतिक्रमण विरोधी मोहीम राबवायला सुरुवात करण्यात आली मात्र याला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केल्याने पालिका अधिकाऱ्याना मोहीम थांबवावी लागली. दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली खडे बाजार मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली. महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र चौक खडेबाजार आणि रामदेव गल्ली तीन पथकाव्दारे एकाचवेळी तीन भागात कारवाई करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी तळ घरात दुकान सुरु केलेल्यावर आणि बेस मेंट अतिक्रमण केलेल्या विरोधात कारवाई करण्यास सुरु केली समादेवी गल्लीतील हनुमान मंदिरापासून बेस मेंट अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली शानभाग हॉटेल पर्यंत कारवाई मोहीम आल्यावर या भागातील व्यापारी वर्गाने भाजप नेते अनिल बेनके यांच्या नेतृत्वात पालिका आयुक्तांना जाब विचारला यावेळी बराच तणाव निर्माण झाला होता.यावेळी व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता पालिकेने कारवाई का केली याचा जाब पालिका आयुक्तांना विचारला. बेसमेंट विरोधी कारवाई बातमी सगळीकडे पोचल्यावर मारुती गल्ली गणपत गल्ली आणि खडे बाजार भागातील व्यापारी इथे दाखल झाले आणि जोरदार विरोध केल्या वर कारवाई थांबण्यात आली .
पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात भाजप नेते अनिल बेनके आणि व्यापाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातील खडे बाजार इतर बाजार पेठ बंद केली. तळ मजल्यात दुकान सुरु केलेल्या वर टाळे ठोकण्या एवजी जे सी बी लावून कारवाई करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न देखील यावेळी व्यापारी विचारताना दिसत होते. या भागात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान यावेळी संपल्यावर आमदार फिरोज सेठ देखील यावेळी दाखल झाले होते तळ माजले सीज करा अशी भूमिका घेतली यावेळी भाजप नेते अनिल बेनके यांनी व्यापाऱ्यांना ८ दिवस मुदत ध्या अशी मागणी केली.
अशी जनतेवर जबरदस्ती करून स्मार्ट सिटी होऊ शकत नाही स्मार्ट सिटी च सिटीच नाव पुढ करून जनतेला विश्वासात न घेता पालिका अधिकाऱ्यांनी केलेलं कृत्य घटना विरोधी आहे सर्वाना विश्वासात घेऊन कोणतीही कारवाई करावी . पालिकेत नगरसेवकांना अधिकारी जुमानत नाहीत हे देखील घटना बाह्य आहे अशी प्रतिक्रिया अनिल बेनके यांनी दिली .
एकीकडे लोक प्रतिनिधींच अतिक्रमण हटवण्यात अपयश आलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी सर्व सामान्य लोकांना टार्गेट केल्याने पुन्हा एकदा अधिकारी विरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या सामान्य माणसाला एक न्याय आणि लोक प्रतिनिधीना एक न्याय अशी पालिका अधिकाऱ्यांची भुमिका आहे या बदल चर्चा सुरु होती.