घरांचे कुलुप तोडून सोन्या चांदीचे दागिने लंपास करणाऱ्या एका टोळीस ए पी एम सी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जे एम कालिमिर्ची आणि सहकाऱ्यांनी तिघांच्या टोळीस जेरबंद केलं आहे.
वैभव नगर येथील आरोपी अनवर हुसेनसाब सय्यद, सलीम वजर सय्यद,याकूब इब्राहिम पठाण अशी त्यांची नाव आहेत.राष्ट्रीय महामार्गा वरील धाब्यावर संशयास्पदरिया वावरताना पोलिसांनी 5 लाख किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने 1 लाख किमतीची रिक्षा जप्त केली आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट उपायुक्त सीमा लाटकर यांनी ए पी एम सी पोलिसांचं अभिनंदन केले आहे