बेळगाव जवळील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरील पाहिलं गाव शिनोळी येथे स्वाइन फ्लू ने थैमान घातलं असून एकाच दिवशी दोघा चुलत भावंडं दगावली आहेत.
बेळगावात खाजगी इस्पितळात उपचार सुरू असताना गुंडू पुंडलिक तानगावडे 49 यशवन्त कृष्णा तानगावडे 67 दोघेही कलमेश्वर गल्ली शिनोळी बुद्रुक अशी दोघा चुलत भावांची नाव आहेत. उपचारासाठी गुंडू यांना दक्षता तर यशवन्त यांना जीवनरेखा हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.दोघांनाही स्वाइन फ्लूची लागण झाली आहे हे वैध्यकीय अहवाला वरून स्पष्ट झाले असुन गेल्या चार दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.
या दोघा नंतर शिनोळी येथील आणखी 4 जणांना स्वाइन फ्लू ची लागण झाल्याची माहिती मिळाली असून दोघांना शहापूर येथील माई हॉस्पिटल तर दोघांचे शिनोळी त उपचार सुरू आहेत.चंदगड तालुका हा महाराष्ट्रातील दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो स्वाइन फ्लू सारख्या आजारावर उपचारासाठी सोय नसल्याने रुग्णांना बेळगाव ला यावे लागते शिनोळीत पी एच सी आहे तिथे काही लोक उपचार घेत असतात