बेळगाव येथील नियती फौंडेशन तर्फ़े गोगटे कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकारात्मक दृष्टीकोन’ या विषयावर कार्यक्रम राबविण्यात आला.
प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. आश्विनी बेलगावकर व नियती फौंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या.यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.त्यांच्या शंकाचे निरसन करण्यात आले.
आजकाल मुले लवकर निराश होऊन आत्महत्या सारखा मार्ग निवडतात, अशावेळी त्यांना पालक ,शिक्षक व मित्राशी बोलून आपल्या समस्येवर समाधान शोधले पाहिजे.अशा समस्या असणाऱ्या मुलांनी नियती फौंडेशन शी
कधीही संपर्क करावा ,असे आवाहन करण्यात आले
कार्यक्रमाला पी यु कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ केरूर ,नियतीचे सदस्य व लक्ष्य संस्थेचे सदस्य उपस्थित होते
विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखा मार्ग न निवडता ,निराशेवर मात करून जीवनात यश मिळवण्याचा प्रयत्न करावा. एका विद्यार्त्याची आत्महत्या ही त्याच्या पूर्ण परिवाराच्या हत्येसारखी आहे हे विद्यार्त्यांनी लक्षात घ्यावे,असे वक्त्यांनी सांगितले
नियती फौंडेशन चे डॉ. समीर सरनोबत,सौ, मोनाली शाह, अमित देसुरकर,नकुल लेले,सीमा सोलापूर,मीनल शाह, भूमिका बाजीगर, संतोष मंडोळकर,डॉ चौगुले,प्रसाद कुलकर्णी,संतोष ममदापुर उपस्थित होते
Trending Now