महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते व काही नेते मंडळी बेळगावला आलेल्या बसेसचे
स्वागत करतात आणि जय महाराष्ट्र च्या घोषणा देत आहेत आपण बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री आहात त्यावर आपण कोणती कारवाई करणार ? असा प्रश्न कन्नड पत्रकारांनी केला असता मंत्री रमेश जारकीहोळी म्हणाले की , आपण प्रथम भारतीय आहोत हे विसरून चालणार नाही , प्रत्येकाला आपल्या राज्याची भाषा प्रिय असते पण काही जण स्वतःचा धंदा चालवण्या साठी असे प्रकार करत असावे, मी फक्त विकासाला महत्व देतो . बेळगावचा प्रश्न आताचा नाही तर गेले ६० वर्ष तो सुरूच आहे .
त्यानंतर त्यांना दुसरा प्रश्न कन्नड पत्रकारांनी केला की, येत्या 12 तारखेला संपूर्ण कर्नाटक बंद ची हाक दिली आहे , आपण या बद्दल काय करणार आहात,?, त्यावेळी मंत्री जारकीहोळी म्हणाले की ही काय पाकिस्तानी बॉर्डर नाही काश्मीर सारखी स्थिती इथे नाही , आपण याकडे अधिक लक्ष्य देणार नाही , बेळगाव जिल्ह्यामध्ये सर्व भाषेचे लोक आहेत ,सर्वजण गुण्या गोविंदाने असतात मात्र ,काही लोक याचा धंदा करत आहेत ,पण मी बेळगावच्या विकासाकडे लक्ष देणार आहे.या उत्तरांनी त्यांना उकसवून नसता गोंधळ घालणाऱ्या पत्रकारांची तोंडे पाहण्यासारखी झाली होती.
बातमी सौजन्य : महादेव पवार झी २४ तास
ताझा अपडेट कायम देत असतात.मनपूवक आभार बेळगाव लाव याच . आणि खूप सुबेछ्या