आठवड्याचं व्यक्तिमत्व
नारायण सावंत
नारायण भैरू सावंत, हे नाव आज बेळगाव आणि परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आधार ठरले आहे. शेतकऱ्याने हाक मारली की धावून जाणारी, त्यांना होत असलेल्या अन्यायाबद्दल जागृत करून लढा उभारणारी ही व्यक्ती शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या आवाज आहे.
बेळगाव live ने सावंत यांनी आठवड्याचे व्यक्तिमत्व होण्याचा मान दिलाय. याच आठवड्यात हलगा येथील सांडपाणी प्रकल्पास विरोध करण्यासाठी मनपावर जो भव्य मोर्चा झाला त्याचे नेतृत्व नारायण सावंत यांचेच. आपल्या धडाक्याने त्यांनी प्रशासनाला मोठा दणका दिला आहे.
नारायण सावंत यांच्यावर आजवर अनेक संकटेही आली आहेत. मात्र प्रत्येक संकटाला धीराने तोंड देत त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
आलेल्या अनेक आमिशांना धुडकारून लावून त्यांनी आपली निष्ठा दाखवून दिली आहे.यामुळेच बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्षपद त्यांना जनतेनंच बहाल केले आहे, यामुळेच त्यांना हे काम करण्याची ऊर्जा प्राप्त होत आहे.
सावंत हे स्वतः शेतकरी आहेत. शेतकऱ्यांची सुपीक जमीन कोणत्याही कारणासाठी हिसकावली जाऊ नये हा उद्देश घेऊन त्यांचे काम सुरू आहे. यासाठी तहान, भूक, विश्रांती सारेकाही बाजूला ठेऊन मागील १० वर्षांपासून ते लढत आहेत.
ते पहिल्यांदा चर्चेत आले ते शाळा नं २९ साठीच्या लढ्यासाठी. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यांनी गांधीनगर येथील सुपीक जमीन वाचवून घेतली. बेळगावातील सुपीक जमिनीचे landuse बदलले , रेल्वे ओव्हर ब्रिज चा लढा, मच्छे येथील बायपास चा लढा प्रत्येक गोष्टीत ते आघाडीवर दिसतात.
न्यायाच्या लढाईत शेतकरी कमी पडू नव्हे ही त्यांची धडपड आहे. त्यांच्या कार्याला बेळगाव live चा सलाम.