Sunday, April 28, 2024

/

यु पी एस सी त बेळगावचे तिघे चमकले

 belgaum

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा बेळगावच्या तीन जणांनी यश मिळवलं आहे. भारतनगर खासबाग येथील वेंकटेश मोहन धोत्रे 246 वा क्रमांक,भाग्य नगर येथील प्रतीक राजकुमार पाटील 544 तर सुळेभावी येथील सुधीर हलाप्पा पाटील 680 क्रमांक मिळवत यश संपादन केल आहे.
वेंकटेश धोत्रे याने मागील यु पी एस सी प्रयत्नात 653 वा क्रमांक मिळवला होता आणि तो आसाम शिवसागर येथे सब डिव्हिजन पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होता आता त्याचा 246 वा क्रमांक असल्याने आय ए एस बनण्याची शक्यता आहे.बंगळुरू मध्ये इंजिनियरिंग शिक्षण घेतलेल्या वेंकटेश यांन दिल्लीत यु पी एस सी चा अभ्यास केला होता. वेंकटेश हा भाजप नेते पांडुरंग घोत्रे यांचा पुतण्या आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.