Monday, January 6, 2025

/

डोळ्यात मिरची पावडर फेकून व्यापाऱ्याची लूट, लांबविले बारा लाख

 belgaum

अनिल पोरवाल रा मंगल अपार्टमेंट केळकर बाग या सुपर ट्रेडर्स च्या मालकाची डोळ्यात मिरची पावडर टाकून लूट करण्यात आली आहे.गुरुवारी रात्री दहाच्या सुमारासANIl porwal हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नरगुंदकर भावे चौक येथील सुपर ट्रेडर चे मालक अनिल पोरवाल यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ही बारा लाख रुपये रक्कम लुटली आहे.घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांनी श्वान पथकासह घटनास्थळी पाहणी केली .या प्रकरणी पोलिसांनी सांगितलेल्या माहिती नुसार अनिल पोरवाल हे माणिकचंद चे व्होलसेल व्यापारी आहेत ते नेहमी प्रमाणे बुधवारी रात्री आपलं दुकान बंद करून केळकर बाग ला आले असता नवग्रह मंदिरा जवळ अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली अन 12 लाख रुपये रोख रक्कमेची बॅग लांबबिली आहे.दोघा जणांनी त्यांना लुटलं आणखी एक लुटारू दुचाकी सह केळकर बागेतील बोळात होता अशी माहिती उपलब्ध झाली आहे.खडे बाजार पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मोदींनी केलेल्या कॅशलेस नंतर एखादया व्यापाऱ्याकडे 12 लाख रक्कम असणे हा देखील चर्चेचा विषय आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.