belgaum

महाराष्ट्र एस टीच्या लोगोत झळकला जय महाराष्ट्र

0
625
st-new-logo
 belgaum

st-new-logoकर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या लोक प्रतिनिधींच पद रद्द करतो अशी धमकी दिल्या नंतर बेळगाव सह सीमाभागात जय महाराष्ट्र घोषणेचा जयघोष करण्यात आला होता याचे लोण कर्नाटकातच नाही कोल्हापूर सह महाराष्ट्रात देखील पसरले होते शिवसेनेनं आंदोलन करत कोल्हापूर मध्ये कर्नाटक बस वर देखील जय महाराष्ट्र रंगवून सीमावासीयांना पाठिंबा दर्शविला होता.
परिवहनमंत्री मंत्री दिवाकर रावते यांनी महाराष्ट्राच्या सर्व एस टी बस वर जय महाराष्ट्र लिहिणार अशी घोषणा केली होती त्यानुसार परिवाहन खात्यानं जय महाराष्ट्र असलेला लोगो प्रकाशित केला आहे.शिव सेना जन संपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी जय महाराष्ट्र लिहिलेल्या नवीन लोगो परिवहन मंत्रालयाने जाहीर केल्याचा वृताचा बेळगाव live कडे दुजोरा दिला आहे.
रावते यांना बेळगावात येऊन आंदोलन करण्यास कर्नाटक पोलिसांनी अडवलं होत बेळगाव जिल्हा प्रशासनाने प्रवेश बंदी केली होती त्यामुळं मंत्री दिवाकर रावते यांनी आपला अधिकार वापरत जय महाराष्ट्र नारा दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.