एखाध्या राष्ट्रीय पक्षाच्या नावाने रस्त्याच नाव असणे फार क्वचितच ठिकाणी असेल बेळगाव मात्र याला अपवाद आहे . महात्मा गांधीजी यांच्या अध्यक्षतेखालील पाहिलं आणि कॉंग्रेस चे २४ वे अधिवेशन १९२४ साली बेळगावात झाल होत टिळकवाडीतील ज्या भागात हे राष्ट्रीय कॉंग्रेस च अधिवेशन भागाला भरलं होत त्यास कॉंग्रेस रोड अस नाव देण्यात आल आहे तेच नाव आजही प्रसिद्ध आहे .
या अधिवेशनावेळी देशभरातून हजारो कॉंग्रेस कार्यकर्ते जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक या अधिवेशनास आवर्जून उपस्थित होते . या अधिवेशनास ये जा करण्यासाठी खास एका रेल्वेची देखील सोय करण्यात आली होती . अधिवेशनास आलेल्या स्वातंत्र्य सैनिक लोकांची सोय करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय आताच्या कॉंग्रेस विहीर करण्यात आली होती सोय केलेल्या या (पाण्याच्या हौदास)”पंप सरोवर” अस नाव देण्यात आल होत .महात्मा गांधी यांच्यासह लोकमान्य टिळक, सुभाष चंद्र बोस, पंडित जवाहरलाल लाल, अब्दुल गफ्फार खान, वल्लभभाई पटेल, एनी बेजंट अश्या महनीयांनी तसच झाडून स्वातंत्र्य सैनिकानी उपस्थिती लावल्याने हे अधिवेशन ऐतिहासिक झाले होते. या घटनेची आठवण म्हणून या टिळकवाडीतील रस्त्याच नाव कॉंग्रेस रोड अस पडल होत आणि आजही ते प्रचलित आहे .
कॉंग्रेस विहीर …
अधिवेशना नंतर कॉंग्रेस विहीर जशी ती तशीच होती या विहिरीत शहरातील एकमेव पोहण्याची विहीर असल्याने पोहण्यासाठी त्याचा वापस होत असे . काही दिवसा नंतर दुर्लक्ष झाल्यावर कॉंग्रेस विहीर मोडकळीस आली होती अडगळीत पडलेल्या या विहिरीत अनेक आत्महत्त्या व्हायच्या त्यामुळे या ऐतिहासिक विहिरीचे जीर्णोधार करा अशी मागणी होत होती . बेळगाव महा पालिके कडे देखील निधी उपलब्ध नसल्याने हे काम होत नव्हते शेवटी राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारच्या तब्बल दीड कोटी निधीतून कॉंग्रेस विहीर चे वीर सौध मध्ये परिवर्तन झाल. कॉंग्रेस अधिवेशनाची आठवण म्हणून जेष्ठ पत्रकार कै आर एच कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन जिल्हाधिकारी अतुलकुमार तिवारी यांनी प्रयत्न करून दीड कोटी खर्च वीर सौध बांधली आहे .
या वीर सौध मध्ये आत विहीर, महात्मा गांधीजींचा समाधीस्त पुतळा,गार्डन गांधीजी फोटो जीवनावर आधारित चित्र आहेत. दरवर्षी गांधी जयंतीला या ठिकाणी कार्यक्रम होतो. याच निर्माण झाल्या नंतर वीर सौध महा पालिकेकडे हस्तांतर करण्यात आल असून पालिका याची देखभाल करते .
बेळगावच्या शहरात ऐतिहसिक असलेल्या या वास्तुच वीर सौध असलेल नाव बदलण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे . कॉंग्रेस विहीर कॉंग्रेस रोड हे बेळगावला कॉंग्रेस ची देण आहे आजही हे दोन्ही बेळगाव शहराची शान वाढवत आहेत मात्र कॉंग्रेस च्या नेत्यांनी या ऐतिहासिक वास्तूकडे दुर्लक्ष केल आहे .