आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा राज्य सरकारने आज दिला आहे. सहकार संघ आणि बॅंकेतील 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्याकडून कर्ज माफीची मागणी होती. विविध जिल्हात त्यासाठी आंदोलन झाली विरोधी पक्ष प्रचारात प्रमुख मुद्दा बनविला होता. आज सहकार खात्यातील अनुदान विषयावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याची घोषणा केली आहे. 22 लाख 27 हजार 506 शेतकऱ्यांना या कर्ज माफीचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीयकृत आणि वाणिज्य बँकेतील कर्ज सुमारे 80 टक्के आहे. हे कर्ज केंद्र सरकारने माफ करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी करून केंद्राला पत्र पाठविले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
एक लाख कर्ज माफ करा अन्यथा भाजप पुन्हा रस्त्यावर – खासदार अंगडी
राज्य सरकारने केवळ ५० हजार रुपया पर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफी केली आहे या कर्ज माफी साठी भाजप गेली एक वर्ष सतत आंदोलन करत आहे या ५० हजार कर्ज माफी नी काहीही होणार नसून राज्य शासनाने एक लाख रुपया पर्यंत कर्ज माफ करावी अन्यथा भाजप पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुरेश अंगडी यांनी दिला आहे .
मुख्यमंत्र्यांच्या कर्ज माफी घोषणे नंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते . सरकारने फक्त सहकारी बँकेतील कर्ज माफ केल असल तरी राष्ट्रीय कृत बँकेतील कर्ज देखील माफ कराव आणि या साठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा करावा अशी मागणी देखील अंगडी यांनी केली आहे