भारतीय संस्कृतीने योग ही जगाला दिलेली देणगी आहे प्राचीन काळा पासून योग ही मानवाला संजीवनी देणारी भारतीयांची देणं आहे असं मत जिल्हाधिकारी एन जयराम यांनी व्यक्त केलं आहे.
गांधी भवन येथे जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत आणि आयुष खात्याच्या वतीनं आंतर राष्ट्रीय योग दिनाच उदघाटन केल्या नंतर ते बोलत होते.आरोग्य मान आणि आपलं ज्ञान वाढविण्यासाठी ऋषी मुनी साधु संत योगाअभ्यासाचा वापर करत होते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाअभ्यासाला अधिक महत्व देण्याचं श्रेय पंत प्रधान मोदी यांना जातंय .5 हजार वर्षाचा इतिहास परंपरा योगाला आहे असं खासदार सुरेश अंगडी म्हणाले.
यावेळी अनेकांनी योगाची प्रात्यक्षिक सादर केली.