सध्या रमजान ईद चे दिवस सुरू आहेत बस स्थानक खडे बाजार परिसरातील अनेक हॉटेल्स मध्ये खाद्य पदार्थांच्या रेलचेलीला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. नॉन व्हेज बनवणाऱ्या हॉटेल्स मध्ये देखील चांगले पदार्थ विकण्यासाठी स्पर्धाच सुरू झाली आहे.
शेट्टी गल्ली कॉर्नर जवळ नुकताच सुरू झालेल्या अरेबियन फूड्स पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या अरेबिया हॉटेल वर पोलिसांनी त्रास देण्यास सुरुवात केली आहे. हॉटेल समोरील त्यांच्याच हद्दीत बनवलेले कौंटर बंद पाडले आहेत.शनिवारी रात्री मार्केट पोलिसांनी हॉटेल समोरील फ्राय कौंटर बंद करून दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे.
बस स्थानका शेजारील एक मोठ्या हॉटेल व्यवसायिकाच्या दबावामुळ पोलिसांनी ही कारवाई केल्याचं बोललं जातं आहेत बस स्थानका समोरील हे नॉन व्हेज हॉटेल राजकीय आणि पोलिसी वरदहस्ताने रात्री उशिरापर्यंत सुरू असते मात्र अरेबिया सारख्या नवख्या हॉटेल ना व्यवसायिक स्पर्धेतुन त्रास होत असल्याचे देखील बोलले जात आहे. ऐन सणात रमजान महिन्याच्या उपवासाच्या निमित्ताने या भागात रात्रभर हॉटेल्स सुरू असतात दरबार गल्लीत तर पालिकेच्या वतींन रस्त्यात खाद्य स्टॉल लावण्यात आलेत मात्र हॉटेल समोरील स्वतःच्या हद्दीत उभारलेला फ्राय विक्री स्टॉल पोलिसांनी हटवल्याने याची चर्चा जोरात सुरू आहे