25 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात जय महाराष्ट्र घोषणेचा जय घोष केलेल्या आणि 2 जून रोजी जय महाराष्ट्र लिहिलेल्या महाराष्ट्र परिवाहन मंडळाच्या बस च स्वागत केलेल्या अश्या दोन्ही केस मध्ये समितीच्या 3 कार्यकर्त्याना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
समितीचे मदण बामणे आणि गणेश दड्डीकर या दोघांना दोन्ही केस मध्ये तर सूरज कणबरकर याला बस च स्वागत केलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. आठवे जिल्हा सत्र न्यायाधीश पाटील यांनी ता तिघांना जामीन मंजूर केला आहे.या केस मध्ये वकील म्हणून महेश बिरजे यांनी काम पाहिले.
मराठी आंदोलन दाबण्यासाठी पोलीस मराठी भाषिकावर अनेक गुन्हे घालत आहेत हे या दोन्ही केस मध्ये पुन्हा एकदा समोर आलं आहे.