पाण्याच्या बाटली स भरमसाठ रक्कम स्वीकारणाऱ्या हॉटेल आणि चित्रपटगृह चालकांविरोधात आवाज उठविणाऱ्या वकील हर्षवर्धन पाटील यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. बेळगाव बार असोसिएशन ने संपाची धमकी देताच याबद्दल काकती पोलिसात एफ आय आर दाखल झाली आहे.
वकील हर्षवर्धन 20 मे रोजी मित्रासमवेत हॉटेल आयरिश हाऊस ला गेले होते, यावेळी काही लोकांनी त्यांनी चालविलेल्या कामाची स्तुती केली, एक ग्राहकाने सदर हॉटेल सर्विस चार्जेस लावत असल्याचा मुद्दा उघडकीस आला. याबद्दल हर्षवर्धन यांनी त्या हॉटेलच्या मॅनेजर ला विचारले, यावेळी हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण करीत बाहेर काढले व तूच तो वकील आहेस ज्याच्यामुळे आमचे नुकसान होत आहे, आम्ही तुला ठार मारू अशी धमकीही देण्यात आली.
त्या कामगारांवर कलम 341,504,506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे