belgaum

Machado petereकेवळ माजी महापौर ही विजय मोरे यांची ओळख नाही, ते एक निःस्वार्थी समाजसेवक आहेत. गरीब आणि गरजूंसाठी त्यांनी चालविलेले काम दखलपात्र आहे. मदर तेरेसांनी जसा गोरगरीब रुग्णात देव पहिला तसेच काम मोरे करीत आहेत .
बेळगाव डायॉसिस चे बिशप रे फा पीटर मचाडो बोलत होते. येथील उजवाड कोकणी मासिकातर्फे आज विजय मोरे यांच्या कार्याबद्दल गौरव करण्यासाठी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

बिशप हाऊस येथे हा समारंभ झाला. आपल्या दैनंदिन सामाजिक कामांबरोबरीने विजय मोरे यांनी जी बी सिन्ड्रोम झालेल्या रुग्णांना मोठी मदत दिली आहे. याबद्दल त्यांना सत्कार करून प्रोत्साहन देणाऱ्या उजवाड परिवरचेही त्यांनी कौतुक केले.

समाजाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, मानवता आणि समाजसेवा हीच शिकवण प्रत्येक समाज देतो, यामुळे जात पात धर्माची बंधने झुगारून विजय मोरे सारखे काम करणाऱ्या प्रत्येकाचा सत्कार करून त्याला प्रोत्साहन द्यावे, तरंच अनेक माणसे पुढे येतील असे बिशप म्हणाले.

विजय मोरे यांनी जी बी सिन्ड्रोम च्या रोग्यांना मदत करण्यासाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले. मृत्यूच्या जबड्यात नेणारा हा रोग भरमसाठ पैशांच्या उपचारांनी बरा होतो. यामुळे सरकारने पुढे यावे, या रोगाचे प्रमाण वाढत असताना लागणारी महागडी औषधे स्वस्त करावीत.असे सांगून हा फक्त माझा नव्हे तर मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचा सत्कार आहे, असेही ते म्हणाले.
माजी महापौर सतीश गौरगोंडा, उजवाड चे संपादकीय सल्लागार जेरोम आंद्रदे, गिरगोल रोड्रिंक्स, झेव्हिएर गोंसलविस, मिनिन रोड्रिंक्स, संतान डिमेलो उपस्थित होते. संपादक लुईस रोड्रिंक्स यांनी विजय मोरे यांच्या कार्याचे कौतुक केले.
गेल्या दोन दिवसांपूर्वीच बेळगाव live च्या आवाहना नुसार मोरे यांनी वझे गल्ली वडगाव येथील बी जी सिन्ड्रोम झालेल्या महिलेस उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.