सेंट पॉल शाळेच माजी विद्यार्थी संमेलन ठरलं जगातील सर्वात मोठ पुनमिलन सोहळाबेळगाव शहरातील जुनी असणाऱ्या सेंट पॉल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा पुनरमिलन सोहळा हा जगातील सर्वात मोठा माजी विधयार्थ्यांचा मेळावा ठरला आहे. 17 डिसेंम्बर 2016 रोजी सेंट पॉल शाळेच्या मैदानात 3638 माजी विद्यार्थी एकत्रित आले होते. या इव्हेंट ला’पोलाईट रॅली’अस नाव देण्यात आलं होतं
गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड या संस्थेने बुधवारी अधिकृत रित्या या रिकॉर्ड ला आपल्या संकेत स्थळावर स्थान दिल आहे.1856 साली कॅम्प येथे सेंट पॉल शाळेची स्थापना करण्यात आली होती या शाळेनं जगात सर्वात मोठा विधयार्थ्यांचा पुनरमिलन सोहळा भरविला होता.
17 डिसेंम्बर 2016 रोजी झालेल्या या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात 3638 माजी विद्यार्थी आणि शिक्षकानी सहभाग नोंदवत इतिहास घडविला होता.शाळेचा 160 वर्षांचा दैदिप्यमान इतिहास त्यांची आचिवमेंट साठी हे पुनर मिलन संमेलन आयोजित करण्यात आलं होतं.1943 ते 2016 पर्यंत चे 3638 माजी विध्यार्थी (paulites) माजी शिक्षक कर्मचारी सर्वांनी एकत्रित येऊन हा विश्व विक्रम बनविला आहे. 2006 मध्ये स्टेडीयम स्कुल वशिंग्टन या अमेरिकेच्या शाळेचं 3299 माजी विध्यार्थयाच्या पुनमिलन सोहळ्याचं रिकॉर्ड तोडत मागे टाकलं आहे.
अजून आम्हाला प्रिंटेड अधिकृत प्रमाण पत्र गिनीज वर्ल्ड रिकॉर्डस संस्थेकडून मिळालं नाही मात्र ते लवकरच मिळणार आहे हे फक्त वेबसाईट वर अपलोड करण्यात आलं आहे आणि आम्हाला देखील या माध्यमातून समजलं आहे.आम्ही केलेल्या प्रयत्नास यश मिळालं आहे आम्हाला याचा अभिमान आहे याच क्रेडिट सर्वांचं आहे अशी प्रतिक्रिया सेंट पॉल माजी विधयार्थी संघटनेचे अध्यक्ष मनोज मायकल यांनी बेळगाव live शि बोलताना दिली आहे