Sunday, December 22, 2024

/

दशहत माजवणाऱ्यावर कठोर शासन करा-शिवसेना

 belgaum

Shivsenaशांत असलेल्या बेळगाव शहरात खंडणीच्या नावाखाली दशहत माजवणाऱ्या सामाजिक तेढ निर्माण वर कठोर शासन करा अशी मागणी बेळगाव शिवसेनेने केली आहे. शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या नेतृत्वात सेनेच्या शिष्टमंडळान पोलीस आयुक्त टी जी कृष्णा भट्ट यांची भेट घेतली सदर मागणी केली आहे.

कुख्यात गुंड रशीद मलबारी गेल्या 30 एप्रिल रोजी बेळगाव शहरात झालेल्या शिवजयंती मिरवणूकीत गोंधळ माजवण्याच्या उद्देशाने समील झाला होता दशहत माजवण्यासाठी त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर आणि आमदार संभाजी पाटील याची हत्त्या करण्याचा कट त्यानं त्याच्या साथीदारांनी रचला होता अशी माहिती पोलीस तपासात बाहेर पडली होती. या पाश्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यानी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.स्वताच रक्षण करण्यास शिव सैनिक सक्षम आहेत तरी देखील पालिसांनी संरक्षण पुरवाव अशी मागणी देखील सेनेनं केली आहे.यावेळी बंडू केरवाडकर, दिलीप बैलूरकर,सचिन गोरले, राजकुमार बोकडे, दयानंद चोपडे,महेश गावडे,प्रवीण तेजम, तानाजी पावशे, सह अन्य शिव सैनिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.