बेळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना कॉंग्रेस मध्ये मोठ पद मिळण्याची चिन्ह असून कर्नाटक राज्य प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पद दिल जाऊ शकत अशी माहिती बेळगाव live कडे झाली आहे. कालच गृह मंत्री जी परमेश्वर यांची के पी सी सी अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली होती मंत्री डी के के शिव कुमार हे लॉबिंग मध्ये कमी पडल्याने पुन्हा एकदा परमेश्वर यांना पक्ष श्रेष्ठींनी हे पद देऊ केले आहे.
एक वर्षा नंतर होणार्या विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यावर वर्चस्व असलेले माजी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना के पी सी सी च कार्याध्यक्ष पद देण्याचा विचार सुरु आहे याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे . सतीश जारकीहोळी यांचे बंधू पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्यातील शीत युद्धाचा परिणाम लक्षात घेता आधी बंगळूरू मग दिल्लीत सतीश आणि रमेश यांच्यातील वाद मिटविण्यात आला होता आणि तिथेच सतीश यांना ठोस आश्वासन मिळाल असल्याची माहिती देखील बेळगाव live ला मिळाली आहे. के पी सी सी च कार्याध्यक्ष पदासह बेळगाव जिल्हा आणि उत्तर कर्नाटकात तिकीट वाटपात सतीश जारकीहोळी यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे . सतीश जारकीहोळी यांना कार्याध्यक्ष पद मिळाल्यास बेळगाव जिल्ह्यातील राजकारणाची राजकारणाच चित्र पुन्हा बदलणार आहे.